सनातन संस्थेकडून मांडण्यात येणार्या आध्यात्मिक सूत्रांचा प्रतिवाद करता न आल्याने स्वतःची स्टंटबाजी उघड झाल्यावर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करणार्या तृप्ती देसाई !
- धादांत खोटे आरोप करून सनातनची अपकीर्ती करणार्या तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
- तृप्ती देसाई यांनी इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत आरोप !
मुंबई : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुंबई मिरर वृत्तपत्राच्या पत्रकार अलका धुपकर यांना दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्थेवर गरळ ओकतांना, मी (तृप्ती देसाई) कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करतांना मला सनातनने ठार मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे दुसरे कुणी अशी आंदोलने करू शकणार नाहीत, असे सांगितले.
तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले आहे कि,
१. सनातन संस्था मला तीव्र विरोध करत आहे. संस्था उघडपणे म्हणते की, त्यांच्याकडे बहुमत असून ते त्याद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहेत. (सनातनकडे बहुमत वगैरे आहे, असे सनातनने कधीही म्हटलेले नाही. यावरून तृप्ती देसाई जाणूनबुजून सनातनची अपकीर्ती करत आहेत, हे दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. मला फेब्रुवारी २०१६ मध्ये पत्र मिळाले की, जर मी निषेध करणे थांबवले नाही, तर माझी गत डॉ. दाभोलकरांसारखी करण्यात येईल.
३. कोल्हापूरला मी गेले असता हिंदुत्ववादी म्हणत होते, तिला ठार मारा जेणेकरून यापुढे कोणीही असे करण्याचे धारिष्ट्य परत करणार नाही. शेवटी मी घटनेने प्रदान केलेल्या अधिकारांसाठी लढा देत आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. मला अशा धमक्या थांबवू शकत नाहीत. (घटनेच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांवर घाला घालणार्या तृप्ती देसाई घटनाविरोधीच कृत्य करत आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. ही आणीबाणीच आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा खटला घातला. भाग्यनगर येथील विश्वविद्यालयात ४ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, जेएन्यूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक केली. ही सर्व आणीबाणीचीच लक्षणे आहेत. हे सर्व भाजपवर उलटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दुटप्पी भूमिका अंगीकारत आहेत.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात