इराकमधील अमेरिकी दूतावासावरील आक्रमणास इराणला उत्तरदायी ठरवत अमेरिकेची चेतावणी !
भारताने इतक्या वर्षांत पाकला कधी अशी चेतावणी दिली आहे का ? अमेरिकेप्रमाणे भारत वागला असता, तर जिहादी आतंकवाद आणि पाक या दोन्ही समस्या कायमच्या सुटल्या असत्या !
वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकेच्या दूतावासावर झालेल्या रॉकेट आक्रमणाच्या प्रकरणी इराणला उत्तरदायी ठरवत त्याला चेतावणी दिली आहे. ‘इराकमध्ये अमेरिकी नागरिकांवर अजून आक्रमणे होणार असल्याची चर्चा आम्ही ऐकत आहोत. इराणला माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. या आक्रमणामध्ये एक जरी अमेरिकी नागरिक ठार झाला, तर सैन्य कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी देणारे ट्वीट ट्रम्प यांनी करत या रॉकेटचे छायाचित्रे पोस्ट केले आहे.
या दूतावासावर जवळपास ८ रॉकेट सोडण्यात आले. यात इराकचे अनेक सैनिक घायाळ झाले, तर वाहन आणि इमारती यांची हानी झाली. इराणकडून इराकमध्ये ३ जानेवारीला जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असल्याने तिची आठवण करून देत आक्रमण केले जाऊ शकते, अशी अमेरिकेला भीती वाटत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात