हिंदूंनो, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात सण साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या आणि त्यासाठी सिद्ध व्हा !
हजारीबाग (झारखंड) : येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ करण्यात आली होती. या दंगलीला हिंसाचाराऐवजी वैयक्तिक कारणे होती, असे सांगून पोलिसांकडून धर्मांधांच्या हिंसाचाराची झळ मवाळ करण्याचा प्रयत्न चालवण्यात येत आहे.
पोलिसांच्या मते शोभायात्रेमध्ये वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे हा हिंसाचार भडकला असावा. हे गाणे तसे मुळीच वादग्रस्त नव्हते. यापूर्वी याहून अधिक प्रक्षोभक गाणी लावली जात होती; मात्र तीही पाकिस्तानचा नाश करू या आशयाची असायची. त्यात जातीयवादाचा लवलेशही नसायचा, असे पोलिसांनी सांगितले. (याचाच अर्थ धर्मांधांना हिंदूंच्या सणांमध्ये हिंसाचार करण्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसे असते. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध गाणे लावले, तर ते हिंसाचार करतात. त्यावरून त्यांची निष्ठा कुठल्या देशाशी आहे हेही स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात