कोल्हापूर : पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी असणारे निवेदन सनातन संस्थेच्या वतीने येथील पोलीस निरीक्षक श्री. अत्तार यांना देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. हिंदु महासभेच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा श्रीमती रेखा दुधाणे, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, हिंदु महासभा शहर अध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनचे श्री. शिवाजीराव ससे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधकही उपस्थित होते. या वेळी श्री. अत्तार यांनी आश्वारसन दिले की, वरिष्ठांना कळवतो. या प्रकरणाच्या संदर्भात निःष्पक्षपणे योग्य ती कारवाई करण्यात येईल.
‘पोलिसांनी या घटनेचा वस्तूनिष्ठ तपास करावा. केवळ ज्याला पत्र आले, तो आणि माध्यमे सनातन संस्थेचे नाव घेतात म्हणून आपण तसा तपास करू नये. यापूर्वीही अशी धमकी आल्याचे दावे अनेकांनी केले होते; मात्र त्यातील एकही दावा आजतागायत सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी’, अशी मागणी करण्यात आली. डॉ. सुभाष देसाई आणि त्यांचे सहकारी यांची नार्को चाचणी करावी, ते सर्वजण निर्दोष आणि सत्यवचनी असतील, तर या चाचण्यांसाठी स्वतःहून पुढे येतील. ज्या भ्रमणभाष क्रमांकावरून ही धमकी आली आहे, तो क्रमांक पोलिसांनी सार्वजनिक करावा, अशी आमची विनंती आहे. म्हणजे दोषी कोण हे सर्वांना कळेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात