मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करून त्याचे रूपांतर इस्लामी स्थळामध्ये करण्यात येत होते. आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे, याविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
उज्जैन (मध्यप्रदेश) : येथील भर्तृहरि गुफेजवळ असणार्या नाथ संप्रदायाच्या खासगी भूमीवर असणार्या पंच पीरच्या समाधीवर धर्मांधांकडून हिरवा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतांना भर्तृहरि गुफेचे महंत पीर योगी श्री रामनाथ महाराज यांनी साधू-संतांच्या माध्यमांतून त्यांना विरोध करत हाकलून लावले. हे स्थान पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. येथे रंगकाम करण्यास बंदी आहे.
पीर योगी श्री रामनाथ महाराज यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून येथे पंच पीर यांची समाधी आहे. या भूमीवर नाथ संप्रदायाचा मालकी अधिकार आहे. काही धर्मांध येथे येऊन त्याला हिरवा रंग देत असल्याची तक्रार पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एक-दोन वर्षांपूर्वीही असा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली होती. जेथे समाधी आहे त्याच्या शेजारील शेतभूमी नाथ संप्रदायाची आहे. याचे सरकारी कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात