मंदिराजवळील धर्मांधांच्या फुलांच्या टोपलीतून मांसांची वाहतूक होते !
- आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात याहून वेगळी परिस्थिती काय असणार ? यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
- एका मंदिरावर अशा प्रकारे धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, ही स्थिती संतापजनक होय ! गेली अनेक शतके धर्मांध हे हिंदूंवर अत्याचार करत आहेत; मात्र हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने; म्हणजे साधना करून त्यांनी आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची दुःस्थिती पालटलेली नाही !
भाग्यनगर (तेलंगाणा) : आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘डेक्कन क्रॉनिकल’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या मंदिराच्या आजूबाजूला सर्व दुकानांवर मुसलमानांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे.
श्रीशैलम् ब्रह्मारंभा मल्लिकार्जुन स्वामी मंदिराकडून गोशाळा चालवली जाते. येथे १ सहस्र ५४२ गायी आणि बैल आहेत.
१. टी. राजा सिंह यांनी दावा केला आहे की, रझाक नावाची व्यक्ती श्रीशैलम् मंदिराचा कंत्राटदार आहे आणि त्याची पत्नी तेथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. (मंदिराच्या कारभारात धर्मांधांना कसे काय सहभागी करून घेतले जाते ? चर्च किंवा मशिदी येथील कारभारात कधी हिंदूंना सहभागी करून घेतले जाते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) रझाक हा सत्ताधारी वाय.एस्.आर्. पक्षाचे स्थानिक आमदार शिल्पा चक्रपाणी रेड्डी यांच्या जवळचा मानला जातो. (आंध्रप्रदेशमध्ये धर्मांध वरचढ का होत आहेत, याचे उदाहरण ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चक्रपाणी यांचा भाऊ तेलुगू देसम पक्षाचा नेता आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी रजाक याचे मंदिरावर नियंत्रण असते.
२. टी. राजा सिंह म्हणाले की, रझाक याच्यावर अनेक गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. तो फुलाच्या टोपलीतून बकर्याचे मांस नेतोे. याच फुलांचा वापर मंदिराच्या पूजेसाठी केला जातो. रझाकच्या पत्नीच्या साहाय्याने तेथे गोहत्या केली जाते, जी प्रतिबंधित आहे.
३. आमदार शिल्पा चक्रपाणी रेड्डी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘‘संक्रांतीनंतर या सर्व आरोपांवर टी. राजा सिंह यांच्याशी चर्चा करण्यास सिद्ध आहे. हे सर्व आरोप खोटे आणि आधारहीन आहेत. केवळ लोकांना भडकावण्यासाठी करण्यात आलेले आहेत. मीही कट्टर हिंदू आहे आणि माझ्या पैशांतून मंदिर उभारले आहे.’’ (एकीकडे ‘मी कट्टर हिंदू आहे’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे मंदिराच्या कारभारात धर्मांधांना सहभागी करून घ्यायचे’, हे कसे काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. गोशाळेच्या पर्यवेक्षक असणार्या रझाक याच्या पत्नीचे टी. राजा सिंह यांच्या आरोपानंतर स्थानांतर करण्यात आले आहे. (यावरून ‘रझाक याच्या पत्नीच्या कारवाया हिंदुविरोधी होत्या’, असे म्हणण्यास वाव आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात