Menu Close

अकोले (जिल्हा नगर) : आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळला !

  • आदिवासींचे धर्मांतर रोखणार्‍या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांना सरकारने कारागृहात डांबले पाहिजे. अशांवर कठोर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे !
  • १ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करणारे जन्महिंदू हे ख्रिस्त्यांची ही हिंदुविरोधी कृत्ये जाणून जागृत होतील का ?
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

अकोले (जिल्हा नगर) : येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला.

१. एका चर्चचे पाद्री आणि त्यांचे अनुयायी यांनी येथील तिरढे गावातील कचरू सखाराम सारुकते यांच्या भूमीवर चर्चचे भूमीपूजन करण्याचा प्रयत्न केला. (भूमीपूजन हिंदूंचा विधी आहे. मग चर्चचे भूमीपूजन कशासाठी ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी आदिवासींच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. (ख्रिस्त्यांचा धूर्तपणा जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला.

(चित्रावर क्लिक करा)

२. ‘येथे चर्च उभारण्यासाठी आदिवासींची भूमी बक्षीसपत्र करून घेतली होती. वास्तविक तसे करता येत नाही’, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच येथील आदिवासींना आमिषे दाखवून धर्मांतर घडवून आणले जात असल्याचा आदिवासी विकास परिषदेचा आरोप आहे. नाशिक जिल्ह्यातील काही धर्मगुरु येथे येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

३. या घटनेनंतर ग्रामसभा घेऊन धर्मांतर किंवा गावात अंधश्रद्धा पसरवण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. या वेळी आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. याविषयी अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. (पोलिसांनी धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना तत्परतेने अटक का केली नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *