Menu Close

‘अ‍ॅमेझॉन किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध पुस्तकांद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

  • हिंदु महिला अणि मुसलमान पुरुष यांच्यातील शारीरिक संबंधांचे अश्‍लील लिखाण

  • धार्मिक भावना दुखावणारेही लिखाण

  • निलिमा स्टीव्हन्स,  प्रविश सिंग,  सुनिता सारन आदी लेखकांची पुस्तके

अ‍ॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे आणि आताही तो तसेच करत आहे. वेळोवेळी हिंदूंनी विरोध केल्यावर अ‍ॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अ‍ॅमेझॉनची मूळ हिंदुद्वेषी वृत्ती पालटलेली नाही. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने अ‍ॅमेझॉनवर बंदी घातली पाहिजे आणि त्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

नवी देहली : ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाच्या ‘किंडल’ या ‘ऑनलाईन’ पुस्तक विक्री केंद्रावर मुसलमान पुरुष आणि हिंदु महिला यांच्या संबंधांवर अश्‍लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. असे ‘स्वराजमार्ग डॉट कॉम’ या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.

१. ‘इंडियन हिंदु वाईफ्स अफेर विथ हर मुस्लीम लव्हर’ (भारतीय हिंदु पत्नीचे मुसलमानाशी प्रेमप्रकरण) हे यापैकीच एक पुस्तक आहे. हे पुस्तक ‘किंडल’च्या अनलिमिटेड सबस्क्रीप्शनमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाची लेखिका निलिमा स्टीव्हन्स आहे.

२. ३५ पानांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुसलमान पुरुष आणि टिकली लावलेली हिंदु महिला दाखवण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये विवाह झालेली हिंदु महिला श्‍वेता आणि तिची मुसलमान मैत्रिण रझीया हिचा पती अश्रफ यांच्यामधील लैंगिक संबंधांविषयी अगदी अश्‍लील भाषेत वर्णन करण्यात आले आहे.

३. ‘अश्‍लील वर्णनासमवेतच या पुस्तकामध्ये शाकाहारी असणारी हिंदु श्‍वेता ही अश्रफमुळे मांसाहार करू लागली’, असेही सांगण्यात आले आहे.

४. निलिमा स्टीव्हन्स हिची ‘किंडल’वर २० हून अधिक अशाच प्रकारची पुस्तके आहेत. असेच एक पुस्तक आहे ‘इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर’ (फसवणूक करणारी भारतीय पत्नी : शेजार्‍यासमवेत संबंध) या पुस्तकामध्ये अय्यर कुटुंबतील महिला आणि तिच्या शेजारी रहाणार्‍या मुर्शिद शेख यांच्यामधील संबंधांविषयी भाष्य करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये ‘मद्रासी देहविक्री करणारी’, ‘हिंदु वेश्या’ अशा आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला आहे.

५. निलिमा स्टीव्हन्स यांच्याच आणखी एक ‘चिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्ड’ या पुस्तकामध्येही हिंदु महिला आणि मुसलमान व्यक्ती यांच्यातील संबंधांचे अगदी अश्‍लील वर्णन करण्यात आले आहे.

६. सुनिता सारन नावाच्या लेखिकेचीही अनेक पुस्तके ‘किंडल’वर उपलब्ध आहेत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक दाढी असणारा पुरुष आणि २ महिला दिसत आहेत. एका महिलेने साडी नेसलेली असून दुसरी अंगावर चादर ओढून बसलेली दिसत आहे. हा पुरुष या महिलांना धमकावून त्यांच्यावर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडिओ बनवून दाखवण्याची धमकी देतो, अशी कथा या पुस्तकात आहे. या महिलांना या व्यक्तीची भीती वाटत असली, तरी त्यांना यामध्ये सुख मिळत असते, असेही वर्णन या पुस्तकात आहे.

७. अशा प्रकारे प्रविश सिंग नावाच्या लेखकाचे ‘हिंदु वाईफ सेक्सी एन्काऊन्टर विथ मुस्लिम ड्रायव्हर’ या नावानेही ‘किंडल’वर पुस्तक उपलब्ध आहे.

केंद्र सरकारने ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या आस्थापनांवर कठोर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती
श्री. सुनील घनवट

देशात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असल्यामुळे उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील सरकारांनी त्याविरोधात कठोर कायदा केला अन् अन्य काही भाजपशासित राज्ये त्याविषयीचा कायदा करत आहेत. असे असतांना ‘अ‍ॅमेझॉन’वर अशा प्रकारच्या पुस्तकाची विक्री होणे, हे निषेधार्ह आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून अश्‍लीलता आणि लव्ह जिहादच्या घटनांना प्रोत्साहन देण्याचाच भाग आहे. ‘अ‍ॅमेझॉन’कडून यापूर्वीही अनेकदा देवतांची चित्रे छापलेली अंर्तवस्त्रे विक्रीसाठी ठेवणे, तसेच राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवणे असे प्रकार करून हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्या धर्मभावना आणि राष्ट्रभावना दुखावण्यात आल्या आहेत. असे प्रकार वारंवार झाले आणि होत आहेत. ‘अ‍ॅमेझॉन’कडून असे अपप्रकार होत असतांना त्याला कुणी चेतावणी दिल्यावर आस्थापन क्षमायाचना करण्याचे नाटक करते. ‘अ‍ॅमेझॉन’वर आतापर्यंत कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यामुळेच त्याच्याकडून अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या आस्थापनाला हिंदूंनी आता संघटित होऊन वैध मार्गाने जाब विचारायला हवा. याचसमवेत केंद्र सरकारने ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या हिंदूंच्या धार्मिक भावना आणि राष्ट्रध्वजाचे विडंबन करणार्‍या आस्थापनावर कठोर कारवाई करावी. तसेच सरकारने अ‍ॅमेझॉनला हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी साहित्य ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी ठेवले असल्यास ते हटवण्यास सांगावे’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *