Menu Close

इंदूर येथे श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यास निघालेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

इंदूर (मध्यप्रदेश) : काही दिवसांपूर्वी राज्यातील उज्जैनमध्ये अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी निधी जमवण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. आता इंदूरमध्येही अशीच घटना घडली आहे.

येथील गौतमपूरा ठाणे परिसरातील चंदनखेडी गावात २९ डिसेंबरला सकाळी ही घटना घडली. ही फेरी एका गावातून दुसर्‍या गावात जात असतांना वाटेत एका धार्मिक स्थळाजवळ उभे राहून फेरीतील कार्यकर्त्यांनी हनुमानचालिसा पठण करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हे कार्यकर्ते पुढे जात होते. तेवढ्यात काही धर्मांध तेथे आले आणि वाद घालू लागले. पोलीस परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांनाच दगडफेक चालू झाली. या दगडफेकीत १२ हून अधिक जण घायाळ झाले. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *