(म्हणे) ‘राज्यघटनेचा पुन्हा अभ्यास करा !’
लव्ह जिहादला विरोध होऊ लागल्यावर धर्मांधांची तळी उचलणारे राजकीय पक्ष पुढे होतेच, आता निवृत्त सनदी अधिकारीही त्यात सहभागी झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या अधिकार्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती हिंदुविरोधी निर्णय घेतले, याची चौकशी केली पाहिजे आणि जे देशातील जनतेला सांगितले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : एकेकाळी ‘गंगा-यमुना संस्कृती’ (गंगा आणि यमुना यांच्या काठावर वास्तव्य करणारे हिंदू आणि मुसलमान एकत्रित नांदण्याविषयी सांगणारी संस्कृती) आणि सभ्यता यांचा स्रोत असलेले उत्तरप्रदेश आता द्वेष, भेदभाव, धर्मांधपणा यांच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे. (तथाकथित गंगा-यमुना संस्कृती म्हणजे धर्मांधांनी हिंदूंवर निधर्मीवादाच्या नावाखालील केलेला अत्याचार होय ! धर्मांधांनी अत्याचार करायचे आणि हिंदूंनी त्याला मान डोलवायची, अशी गंगा-यमुना संस्कृती असून तिला संपवणेच हिंदूंच्या हिताचे आहे; मात्र धर्मांधप्रेमींना ते सहन होत नसल्याने ते अशा प्रकारचे पत्र लिहित आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अशा पत्रांना केराची टोपलीच दाखवावी, अशीच हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राज्यातील सरकारी संघटना सामाजिक भेदभावात अखंड बुडाल्या आहेत. (हिंदूंच्या हिताच्या गोष्टी केल्या, तर तो सामाजिक भेदभाव होतो, असा नवा शोध या अधिकार्यांनी लावला आहे, त्याला उत्तरप्रदेश सरकारने भीक घालू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यासह सर्व नेते, मंत्री पोलीस यांनी ज्या राज्यघटनेची शपथ घेतली त्या घटनेतील तरतुदींचा अभ्यास आणि उजळणी करण्याची आवश्यकता आहे, असे पत्र १०४ निवृत्त सनदी अधिकार्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे. (एखाद्या समाजाच्या मुलींवर धर्माच्या आधारावर अन्याय आणि अत्याचार होत असल्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी सरकारने कायदा केला, तर या अधिकार्यांना पोटशूळ का वाटतो ? असे करणे घटनाविरोधी आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांनी नुकत्याच राज्यात बनवण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यामध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्यास कारागृहात पाठवण्याची, तसेच दंडाची तरतूद आहे.
या अधिकार्यांनी त्यांच्या पत्रात मोराबादमधील घटनेचा उल्लेख केला आहे. हिंदु तरुणीशी विवाह केल्यामुळे मोरादाबादमध्ये २ मुसलमान भावांना पोलिसांनी अटक केली होती. पत्रामध्ये तरुणीने तिच्या संमतीने मुसलमान व्यक्तीशी विवाह केला असतांनाही बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ असा आरोप केल्याचा उल्लेख केला होता. (कुणाला शंका असेल, तर त्याला तक्रार करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे, त्याचा वापर कुणी करत असेल, तर त्याला रोखणे हा राज्यघटनेचाच अवमान ठरील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात