Menu Close

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

  • पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! हिंदूंनी अशा घटना रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कटीबद्ध व्हायला हवे !
  • आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या !

विजयनगरम् (आंध्रप्रदेश) : येथील नेल्लीमरलामध्ये असलेल्या रामतीर्थम् येथील एका डोंगरावरील बोडिकोंडा कोदंडाराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केली. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहाच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि श्रीरामाच्या मूर्तीचे शिर तोडले. ही मूर्ती ४०० वर्षे प्राचीन आहे.

नंतर तोडलेले शिर येथील तलावात विसर्जित करण्यात आले. या मंदिरात मातासीता आणि लक्ष्मण यांचीही मूर्ती आहे. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस अधीक्षकांनी सांगितले, ‘मूर्तीची तोडफोड करण्यामागे षड्यंत्र दिसून येत आहे. तरीही आम्ही अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.’ यापूर्वी राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील एका शिवमंदिरामध्ये आक्रमण करून तेथील नंदीची मूर्तीची तोडण्यात आली होती.

१. जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी म्हटले की, हे काम एखाद्या वेड्याचे असू शकणार नाही. धर्मिक उन्माद असणार्‍यांनी हे काम केले असणार. राज्य सरकार अशा घटनांविषयी निष्काळजीपणा करत आहे. यामुळेच ही घटना घडली आहे. राज्यात सातत्याने मंदिरांवर अशी आक्रमणे होत असतांना मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत ? ते गप्प का आहेत ?

२. तेलुगु देसम् पक्षाचे स्थानिक नेते एस्. रविशेखर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी या घटनेनंतर येथे धरणे आंदोलन केले. तसेच मंदिराला संरक्षण देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. भाजप जिल्हाध्यक्ष आर्. पावनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन आंदोलन करत आरोपींवर कारवाई करण्याची आणि मंदिराला संरक्षण देण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *