उजिरे येथे आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी एस्.डी.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते.
समितीने पुढे म्हटले आहे की,
धार्मिक दंगलींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आतंकवादी कृत्यांना प्रेरणा देणारे लिखाण भिंतीवर लिहिल्याची घटना घडली होती. इतकेच नव्हे, तर याच जिल्ह्यात आतंकवादी घटनांना पाठिंबा देणार्यांना अटक करण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेक प्रकारच्या दंगली घडल्या आहेत. यावरून पुन्हा बेळ्तंगडीत अशा प्रकारे पाकच्या बाजूने घोषणा देणारे, भारतात राहून शत्रुराष्ट्रासाठी काम करणारे कसे कार्यरत आहेत, हे लक्षात येते. अशा राष्ट्रद्रोह्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे; एवढेच नव्हे, तर अशा घटना वरचेवर घडत आहेत याकडे शासनाने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन तत्परतेने याविषयी चौकशी करावी आणि अशा घटनांच्या मुळाशी जाऊन यामागे कोणती संघटना आहे, कोणत्या व्यक्ती आहेत ? याची सखोल चौकशी करावी. अपराध्यांना कठोर शासन करावे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.