Menu Close

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमास स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !

पोलिसांवर दबाव आणून कार्यक्रम पाडला बंद

ख्रिस्त्यांनी अनधिकृतरित्या उभारलेला क्रॉस आणि डाव्याबाजूला पुरातन श्री विजयदुर्गादेवी मंदिराचे प्रवेशद्वार दिसत आहे.

वास्को : सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजाअर्चा आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांच्या नामस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पूजाअर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम चालू असतांना काही वेळाने स्थानिक ख्रिस्त्यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला. घटनास्थळी यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर स्थानिक ख्रिस्त्यांच्या विरोधाला आणखी जोर चढला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर कार्यक्रम आटोपता घेण्यात आल्याने तणाव निवळला.

श्री विजयादुर्गादेवीच्या अस्तित्वाविषयी जागृती करण्याचा स्थानिक भक्तगणांचा संकल्प

३० डिसेंबर या दिवशी कार्यक्रमाच्या प्रारंभी देवीची पूजाअर्चा आदी धार्मिक कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांचा नामस्मरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या वेळी स्थानिक भक्तगणांनी स्थानमाहात्म्य सांगतांना स्वप्नदृष्टांत आदी माध्यमांतून या ठिकाणी श्री विजयादुर्गादेवीचे अस्तित्व जाणवत असल्याचे म्हटले. पूर्वजांनीही याविषयी माहिती दिल्याचे स्थानिकांनी या वेळी उपस्थितांना अवगत केले. या वेळी स्थानिक भक्त श्री. सचित नाईक म्हणाले, ‘‘देवी गावात फिरत असल्याचा स्वप्नदृष्टांत अनेकांना झालेला आहे आणि पूर्वजांकडूनही देवीविषयी माहिती मिळालेली आहे. देवतांचा कौलप्रसाद घेतल्यानंतर याविषयी जागृती करण्याचे स्थानिक भक्तगणांनी ठरवले आहे.’’

आयोजकांनी या वेळी सांगितले की, ‘‘पूर्वी या ठिकाणी दिवा लावला जायचा आणि नारळही ठेवला जायचा. येथील श्री विजयादुर्गेचे मंदिर पोर्तुगिजांनी नष्ट केले. आता येथे श्री विजयादुर्गा मंदिराचे प्रवेशद्वार राहिले आहे आणि आता ते वारसास्थळ म्हणून घोषित झाले असून त्याला ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’, असे संबोधले जात आहे. सरकार दरबारी कुठल्याही धर्माच्या नावावर हे स्थान नोंद झालेले नाही. या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून स्थानिक ख्रिस्ती गेली ३ वर्षे फेस्ताचे आयोजन करत आहेत. येथील वडाचे झाड अनधिकृतपणे कापण्यात आले. येथील श्री विजयादुर्गादेवीच्या अस्तित्वाविषयी जागृती करण्याचा संकल्प स्थानिक भक्तगणांनी सोडला आहे आणि या दृष्टीने ३० डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.’’

(Goa Church captures Shankhavali teerthkshetra archeological site in Goa. Hindus denied access by Church padri by locking entry gate. Padri has decided to lock the gate of Archeological site after the video of illegal erection of crosses became viral on social media.)

(सौजन्य : https://www.facebook.com/watch/sancoaleheritage/)

घटनास्थळी धार्मिक कार्यक्रम करण्यास ख्रिस्त्यांचा तीव्र विरोध

हा कार्यक्रम संपन्न होत असतांना स्थानिक ख्रिस्ती घटनास्थळी आले आणि ही चर्चची भूमी असल्याने येथे हिंदूंनी धार्मिक कार्यक्रम करू नये, असे तावातावाने सांगू लागले. (ते वारसास्थळ असून सार्वजनिक जागा आहे. ती भूमी ख्रिस्त्यांची कधीपासून झाली ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हा ख्रिस्त्यांचा अवमान असल्याचे ते म्हणाले. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनुमती न घेतल्याचे सांगून आयोजकांसह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना स्थानिक पोलीस ठाण्यात नेले. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी पोलिसांच्या अनुमतीशिवाय हिंदूंनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याची समज पोलिसांनी आयोजकांना दिली. (दुसर्‍या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्‍या ख्रिस्त्यांना पोलिसांनी अशी समज का दिली नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

स्थानिक ख्रिस्त्यांना क्रॉस उभारण्यास संरक्षण, तर हिंदूंना कार्यक्रम करण्यास आक्षेप घेणारे दुटप्पी गोवा पोलीस !

सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी (द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ) स्थानिक ख्रिस्ती गेली ३ वर्षे अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन करत आहे. माहिती अधिकाराखाली स्थानिकांनी ही माहिती उघड केली आहे. चुकीच्या भूमी सर्व्हे क्रमांकावर शासनाची अनुमती घेऊन अनधिकृतपणे श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी (द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ) स्थानिक ख्रिस्ती फेस्ताचे आयोजन करत आहेत. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे सरकार दरबारी वारसास्थळ घोषित झालेले असतांना आणि या परिसरात कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करण्यास कायद्याने प्रतिबंध असतांना खोदकाम करून ख्रिस्त्यांनी या ठिकाणी ‘क्रॉस’ लावले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या संरक्षणात हे कार्यक्रम झालेले आहेत. स्थानिक हिंदु भक्तगणांनी ३० डिसेंबर या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास ख्रिस्त्यांच्या दबावाखाली येऊन पोलीस विविध प्रश्‍न उपस्थित करून हिंदूंना कार्यक्रम घेण्यास मनाई करतात, असा आरोप स्थानिक हिंदूंकडून होत आहे.

वारसास्थळ हे सार्वजनिक स्थान, लोकांना त्या ठिकाणी जाण्यापासून वंचित करू नका ! – पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचा स्थानिक चर्चच्या फादरला आदेश

‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसास्थळ आहे आणि लोकांना या ठिकाणी जाण्यापासून वंचित करू नये, असा आदेश पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने सांकवाळ येथील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’चे फादर लुईस आल्वारीस यांना १५ डिसेंबर २०१७ या वर्षी दिला होता. स्थानिक नागरिक मिलन नाईक यांनी केलेल्या तक्रारीवरून पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने हा आदेश दिला होता. हा आदेश असतांना ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही खिस्त्यांची भूमी असल्याचा दावा स्थानिक ख्रिस्ती करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *