- हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर असे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही ! पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
- मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचा असा अवमान करण्याचे धाडस होऊ नये, असा वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! पाकसारख्या इस्लामी देशात कुणी इस्लामचा असा अवमान करू धजावू शकतो का ?
इंदूर (मध्यप्रदेश) : एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करत असतो. त्याने भगवान श्रीराम, गोध्रा येथे कारसेवकांना जाळल्याच्या घटनेची टिंगल करणे आदी कृत्य केले आहे.
इंदूर येथे ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यावर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले. नंतर फारूकी आणि कार्यक्रमाचा आयोजक यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे चित्रीकरण पाहून फारूकी याच्यावर कारवाई करण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात