आता जलद गतीने खटला चालवून अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
इंदूर (मध्यप्रदेश) : एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याने येथे ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यानंतर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले होते.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर फारूकी आणि अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे. येथील भाजपचे आमदार लक्ष्मण सिंह गौड यांचे पुत्र एकलव्य सिंह गौड यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात