Menu Close

इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारलेल्या कुटुंंबाला धर्मांधांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

  • सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस धर्मांधांना पाजण्यात आलेले नसल्याने ते अशा प्रकारे कृत्य करतात, हे लक्षात घ्या !
  • इतकी मोठी घटना घडूनही काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष, तसेच निधर्मी संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशी घटना चुकून हिंदूंकडून झाली असती, तर हिंदूंना ‘तालिबानी’, ‘सनातनी’ असे हिणवून त्यांच्यावर किंवा ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, तर तिच्यावर बंदी घालण्याची मागणीही झाली असती !
  • उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

रायबरेली (उत्तरप्रदेश) : येथील सलोन भागातील रतासो गावात रहाणारे महंमद अन्वर यांनी सप्टेंबर २०२० मध्ये स्वच्छेने इस्लाम सोडून हिंदु धर्माचा स्वीकार केला होता. त्यांनी स्वतःचे ‘देवप्रकाश पटेल’ असे नामकरण केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भूमीवर मंदिर बनवण्यास प्रारंभ केला. हे समजताच येथील धर्मांध सरपंच आणि त्यांचे सहकारी यांनी देवप्रकाश पटेल आणि त्यांची ३ मुले घरात झोपलेली असतांना घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर घराला आग लावून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या वेळी देवप्रकाश पटेल यांनी मागचे दार तोडून स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचवला. या प्रकरणी पोलिसांनी सरपंच ताहिर, रेहान उपाख्य सोनू, अली अहमद, इम्तियाज आदींसह येथील मदरशांतील काही लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून यांतील दोघांना अटक केली.

देवप्रकाश पटेल त्यांच्या भूमीवर मंदिर बांधत असल्यानेच धर्मांध संतप्त झाल हेते. यातूनच त्यांनी देवप्रकाश पटेल यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक यांनी देवप्रकाश पटेल यांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांची भेट घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *