Menu Close

पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती देणारे मानाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण

धर्मांधांची जिहादी वृत्ती उघड करणार्‍यांना धर्मांध कधीतरी जिवंत ठेवतील का ? असे धर्मांध मानवतेचे शत्रू असून जगाने आता त्यांच्याविरोधात संघटित होऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते आणि पाकमध्ये अल्पसंख्यांकांवर धर्मांधांकडून होणार्‍या अत्याचारांची माहिती जगाला देणारे अधिवक्ता राहत ऑस्टिन यांच्यावर धर्माधाने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत चाकूद्वारे आक्रमण केल्याची घटना ५ जानेवारीला घडली. राहत ऑस्टिन यांनी स्वतःहून याची माहिती ट्वीट करून दिली आहे. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ऑस्टिन यांनी म्हटले की, मला ठाऊक नाही की, आक्रमण करणारा कोण होता; मात्र तो मध्य-पूर्वेतील देशांतून आला होता. मी जर स्वतःला वाचवले नसते, त्याने माझा शिरच्छेद केला असता, जसे ते इतरांचे करतात. हे लोक जगामध्ये अशा गोष्टी का करत आहेत ? आम्ही काही चुकीचे करत नाही. मी केवळ सरकार आणि मुसलमानबहुल देशांमध्ये धार्मिक अत्याचार, वर्णद्वेष, नरसंहार, धार्मिक हिंसचार आदींविषयी वार्तांकन करत आहे. हिंसाचार करणारे जिहाद म्हणून ते करत आहेत. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा आम्ही (अल्पसंख्यांक) २३ टक्के होतो, आता केवळ ३ टक्के उरलो आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *