Menu Close

हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे : आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती

युगंधर मर्दानी युद्धकला आणि योगकला प्रशिक्षण केंद्राच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : द्रष्ट्या संतांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या ईश्‍वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी केले. करकंब (तालुका पंढरपूर) येथील युगंधर मर्दानी युद्धकला आणि योगकला प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘हिंदुराष्ट्र आणि हिंदु धर्म’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे आणि शस्त्रपूजन करण्यात आले. विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. अनिल राखुंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी राष्ट्रावर होणारे आतंकवादी आक्रमण, नक्षलवाद, घुसखोरी, लव्ह जिहाद, धर्मांतर यांद्वारे हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांविषयी उपस्थितांना अवगत केले. या वेळी युगंधर केंद्राच्या वतीने युद्धकला आणि योगकला यांची प्रात्यक्षिके मुलांनी सादर केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युगंधर केंद्राचे सर्वश्री अक्षय नगरकर, विजय जाधव, राजेंद्र अनवते यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्षणचित्रे

१. युद्धकलेची प्रात्यक्षिके पहातांना उपस्थितांना शिवकालीन इतिहासाचे स्मरण झाले.

२. या वेळी उपस्थितांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची पी.डी.एफ्. आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या ‘लिंक’ पाठवण्याचे निश्‍चित करण्यात आले.

३. कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍यांनी ‘आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी मांडलेला विषय आवडला’, असे आवर्जून सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *