Menu Close

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

अ‍ॅमेझॉनवर हिंदूंच्या भावनांशी छेडछाड करणार्‍या धार्मिक कट्टरवाद्यांनी आता साहित्याला (पुस्तकांना) नवीन शस्त्र बनवले आहे. ‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु महिलांवरील अश्‍लील पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे. या माध्यमातून अश्‍लीलतेची परिसीमा गाठलेले साहित्य उपलब्ध करून देऊन अ‍ॅमेझॉन किंडल हिंदु धर्माला हानी पोचवण्याचे कार्य करत आहे. हे सनातन हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्र आहे. आज ते थांबवले नाही, तर हिंदु महिलांवरील अत्याचारांना एक असीम गती मिळेल.

१. अ‍ॅमेझॉन किंडलवरील काही पुस्तकांची नावे

अ. इंडियन हिंदु वाईफ्स अफेअर विथ हर मुस्लीम लव्हर (भारतीय हिंदु विवाहित महिलेचे तिच्या मुसलमान प्रेमीशी प्रेमप्रकरण)

आ. चिटींग वाईफ्स अफेअर विथ हजबंड्स फ्रेंड्स (विवाहित महिलेचे तिच्या पतीच्या मित्राशी प्रेमप्रकरण)

इ. इंडियन वाईफ इरॉटिक टेल ट्रीक्ड ट्रॅप्ड हंटेड डिस्ट्रेस्ड मिस्ट्रेस – ३ (भारतीय पत्नीच्या कामुक कथा : फसव्या सापळ्यात अडकेली व्यभिचारिणी – ३)

ई. फोर टेल्स ऑफ हाय क्लास मॅरिड हिंदु वुमेन बिईंग टेकन बाय लो-क्लास मुस्लीम मेल्स. (उच्चवर्गातील विवाहित हिंदु महिला आणि निम्न वर्गातील मुसलमान पुरुष यांच्या प्रेमप्रकरणांच्या चार गोष्टी)

२. या पुस्तकांमध्ये हिंदु महिलांविषयी काय आहे ?

अ‍ॅमेझॉन किंडलने या पुस्तकांमध्ये हिंदु महिलांविषयी लिहिलेले लिखाण वाचल्यावर त्यांचा नीचपणा लक्षात येतो.

अ. धर्मांधांच्या बलात्काराला हिंदु महिला ‘एन्जॉय’ करतात. (आनंद घेतात.)

आ. धर्मांधांच्या सांगण्यावरून शाकाहारी हिंदु महिला मांस भक्षण करण्यासही सिद्ध होतात.

इ. धर्मांधांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हिंदु महिला पैसे घेण्यासही सिद्ध होतात.

एवढेच नाही, तर या पुस्तकांमध्ये याहून भयानक अश्‍लील लिखाण असते, ज्यांची येथे वाच्यता करणेही कठीण आहे. यातून अ‍ॅमेझॉन किंडलने हिंदु महिलांची मान मर्यादा आणि त्यांचे घटनादत्त अधिकार यांची चेष्टा करून त्यांच्या चिंधड्या केल्या आहेत.

३. हिंदु महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन

अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद १४ भारतीय हिंदु महिलांना समतेचा अधिकार देते. अ‍ॅमेझॉन किंडलने हिंदु महिलांच्या या अधिकारांचे उल्लंघन केले नाही का ?

आ. राज्यघटनेचे अनुच्छेद १५ भारतीय हिंदु महिलेला धर्म, मूळवंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर समतेचा अधिकार देते. अ‍ॅमेझॉन किंंडलने हिंदु महिलांच्या या अधिकाराचे उल्लंघन केले नाही ?

४. सरकारने गांभीर्याने घेण्यासारखे काही महत्त्वाचे प्रश्‍न

अ. अ‍ॅमेझॉन किंडलचा उद्देश धर्मांध युवकाकडून हिंदु महिलेवरील बलात्काराला योग्य ठरवणे आणि त्याला प्रोत्साहन देणे आहे ?

आ. अ‍ॅमेझॉन किंडलकडून हिंदु धर्माला हानी पोचवण्याचे षड्यंत्र चालू आहे का ? कारण जेथे धर्मांध युवक आणि हिंदु महिला यांच्या संबंधाविषयी सांगण्यात आले आहे, तेथे हिंदु महिलेवरील चारित्र्यावर प्रश्‍न उपस्थित केला आहे अन् जेथे मुसलमान महिला आणि हिंदु युवक यांच्या संबंधाविषयी सांगण्यात आले आहे, तेथे हिंदु युवकाला अत्याचारी सांगण्यात आले आहे.

इ. अ‍ॅमेझॉन किंडलच्या दृष्टीने हिंदु महिला उपभोगाच्या वस्तू आहेत का ?

ई. अ‍ॅमेझॉन किंडलला एक ‘पॉर्न वेबसाईट’ म्हणून घोषित का करू नये ?

५. हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांच्यावरील आघातांच्या विरोधातील षड्यंत्रामागे आर्थिक स्रोत काय ?

आश्‍चर्याची गोष्ट आहे की, ही पुस्तके विनामूल्य किंवा अतिशय अल्प मूल्यात उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन किंडलला कोणती संस्था आर्थिक साहाय्य करत आहे ? असा प्रकार यापूर्वीही या आस्थापनाकडून झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने एका ‘आयटम’ गाण्यामध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये एक हिंदु महिला पाकिस्तानी पुरुषाची कल्पना करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

६. अन्यथा अ‍ॅमेझॉनला कायम बंद करण्यावाचून सरकारकडे पर्याय नाही !

यापूर्वीही अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळाचा वापर हिंदु भावनांचा अवमान करणार्‍या उत्पादनांची विक्री करण्यासाठी झाला आहे. यासंदर्भात भारत सरकारने वेळोवेळी अ‍ॅमेझॉनवर कारवाई केली आहे; पण त्याने आवश्यक त्या सुधारणा केल्या नाहीत. अशा स्थितीत अ‍ॅमेझॉनला कायमचे बंद करण्यावाचून दुसरा पर्याय सरकारकडे आहे, असे वाटत नाही. याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही लक्ष वेधले आहे. त्यांनी अ‍ॅमेझॉनचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांना अशा प्रकारची सामुग्री काढण्यास सांगितली आहे. ज्यात महिलांच्या विरोधात गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यात आले आणि एखादा धर्म/समुदाय (हिंदु) यांच्याविषयी चुकीचा संदेश देत आहे.

– अधिवक्ता अमिता सचदेवा, देहली उच्च न्यायालय, हिंदु विधीज्ञ परिषद, देहली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *