Menu Close

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल हिंदूंच्या मंदिरांची डागडूजी करत असल्याचा उल्लेख !

माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यावर मात्र कोणतेही पुरावे नसल्याची एन्.सी.ई.आर्.टी.ची स्वीकृती

  • भाजपच्या राज्यातही एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष कायम रहाणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !
  • माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर हा प्रकार उजेडात आला अन्यथा हा खोटा इतिहास उघड झाला नसता ! असे खोटे धडे समाविष्ट करूनही कुणाच्याही हे लक्षात कसे आले नाही कि येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले ?, हे जनतेला कळले पाहिजे. यावरून एन्.सी.ई.आर्.टी.चा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते ! वारंवार इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या अशा संस्था हव्यात कशाला ?
  • ‘इतिहासाचे भगवेकरण’ होत आहे, असा आरोप होत असतांना हे ‘इतिहासाचे इस्लामीकरण’ होत आहे, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या (‘नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या) सयत्ता १२वीच्या ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टू’ या इतिहासाच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांत २३४ वर मोगल बादशहा शहाजहान आणि औरंगजेब यांनी युद्धाच्या वेळी मोगल सैन्याकडून पाडण्यात आलेल्या मंदिरांची नंतर डागडूजी करण्यासाठी आर्थिक तरतूद करून ती केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

तथापि याविषयी माहितीच्या अधिकाराखाली त्याविषयीचे पुरावे आणि संबंधित मंदिरांची माहिती मागण्यात आल्यावर एन्.सी.ई.आर्.टी.ने थेट याविषयीची कागदपत्रे नसल्याचे उत्तर दिले. शिक्षणक्षेत्राशी संबंधित डॉ. इंदु विश्‍वनाथन् यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

१८ नोव्हेंबर २०२० या दिवशी एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा उत्तराचे पत्र अर्ज करणारे शिवांक वर्मा यांना पाठवण्यात आले आहे.

(एन्.सी.ई.आर्.टी. चे पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

यावर ‘हेड ऑफ डिपार्टमेंट अँड पब्लिक इंफर्मेशन ऑफिसर’ प्रा. गौरी श्रीवास्तव यांची स्वाक्षरी आहे. हे पत्र डॉ. इंदू विश्‍वनाथन् यांनी प्रसारित केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *