Menu Close

नागपूर : कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर यांंनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला

  • हिंदुद्वेषाची कावीळ झालेले डॉ. यशवंत मनोहर !

  • कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा काढण्याची डॉ. मनोहर यांची मागणी विदर्भ साहित्य संघाने फेटाळली !

  • प्रकृती, शक्ती, ब्रह्मज्ञान-विद्या, ज्ञान-विद्या, नृत्य, संगीत, कला, साहित्य या क्षेत्रांची श्री सरस्वतीदेवी ही अधिष्ठात्री देवता आहे. शैक्षणिक संस्थांसह सर्वत्र वसंत पंचमीच्या दिवशी आणि नवरात्रोत्सवात श्री सरस्वतीदेवीचे पूजन केले जाते. ही परंपरा असतांना डॉ. यशवंत मनोहर यांना देवतेच्या प्रतिमेचे वावडे केवळ हिंदुद्वेषामुळेच आहे, हे लक्षात येते !
  • डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !

नागपूर : येथील पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात हिंदु धर्मातील श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याच्या कारणावरून साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने डॉ. मनोहर यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार होते; मात्र ‘कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवू नये’, अशी मागणी डॉ. मनोहर यांनी केली होती. मागणी केल्यानंतरही कार्यक्रमात परंपरेप्रमाणे श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यात आली. त्यामुळे अप्रसन्न झालेले डॉ. मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.

साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. मनोहर म्हैसाळकर यांनी ‘श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा हा साहित्य संघाच्या प्रथा-परंपरेचा भाग असून सभागृहाचे नावच रंगशारदा आहे’, असे सांगितले. (हिंदुद्वेषी साहित्यिकांच्या आग्रहास्तव हिंदूंना वंदनीय असलेली विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा न काढल्याविषयी साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. मनोहर म्हैसाळकर यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी महाराष्ट्रातील इतर अनेक लेखकांना त्यांच्या साहित्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.

( सौजन्य : झी 24तास )

डॉ. यशवंत मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. डॉ. इंद्रजित ओरके यांनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली; पण तुम्ही ‘कार्यक्रमात श्री सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच’, असे कळले आहे. ‘मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल’, असे वाटले होते; पण ते झाले नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. (बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! हिंदूंच्या देवतांची महानता समजून घ्यायची असेल, तर त्यासाठी साधना करावी लागते; मात्र तसे काही न करता स्वतःच्या बुद्धीचा अहंकार बाळगणारे असे लेखक समाजाला दिशा दर्शन काय करणार ?  – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांना शिक्षण अन् ज्ञान बंदी करणार्‍या शोषणसत्ताकाची प्रतीके मी पूर्णतः नाकारलीच आहेत. (डॉ. मनोहर यांची जात्यंधता ! प्राचीन काळापासून सनातन हिंदु धर्मात स्त्रिया आणि शूद्र यांना शिक्षणासाठी बंदी कधीच नव्हती अन् ज्या शोषणसत्ताकाची गोष्ट डॉ. मनोहर करत आहेत, ते हिंदु नव्हे, तर मुसलमान राजे होते ! इंग्रज भारतात येण्यापूर्वी अनेक गुरुकुलांमध्ये शेकडोंनी मुले शिकत असल्याचे उल्लेख मिळतात, ती सर्व काही उच्चवर्णियांची नव्हती. श्री सरस्वतीदेवी ही ब्राह्मण किंवा क्षत्रिय यांनी त्यांच्यासाठी बनवलेलेे ‘प्रतीक’ नाही, ती हिंदूंची देवता आहे. सध्या तर आरक्षणपद्धतीमुळे ब्राह्मणांचेच एकप्रकारे शोषण होत आहे. मग कुणाचे प्रतीक डॉ. मनोहर नाकारणार मुसलमानांचे कि सध्याच्या शासनकर्त्यांचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो, त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान. माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणे मला अजिबात मान्य नाही. (डॉ. मनोहर यांची जीवनदृष्टी समाजात जातीद्वेषाचे विष पसरवणारीच आहे, हेच यातून लक्षात येते. त्यामुळे त्यांनी पुरस्कार नाकारला त्यात आश्‍चर्य ते काय !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *