नवी देहली : चीनशी संघर्ष करतांना गलवान खोर्यामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही, असे आश्वासन मी देशाला देतो. भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी चीनला दिली. ते येथे सैन्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आतंकवाद्यांची घुसखोरी होऊ देणार नाही !
पाककडून आतंकवाद्यांची घुसखोरी होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने पाकमध्ये घुसून या आतंकवाद्यांना ठार करणेच योग्य ठरील !
सैन्यदलप्रमुख नरवणे पुढे म्हणाले की, पाकचा नापाक हेतू यशस्वी होऊ देणार नाही. सैन्याने नियंत्रणरेषेवरील त्यांच्या कृतींना सडेतोड उत्तर दिले आहे. आतंकवाद्यांना आश्रय देण्याची पाकला खोड आहे. ३०० ते ४०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा हेतू कधीही पूर्ण होणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात