- बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही !
- काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !
नवी देहली : ‘अॅमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून १५ जानेवारीपासून प्रसारित झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजमधून भगवान शिवाचा अवमान करण्यात आल्याने सामाजिक माध्यमांतून त्याचा विरोध केला जात आहे. यावर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात येत आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास असून यामध्ये सैफ अली खान, महंमद झिशान अयूब, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेब सिरीजमधून जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करण्यासह देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालण्यात आले आहेत. यामुळे याला विरोध केला जात आहे.
सामाजिक माध्यमांतून या वेब सिरीजमधील एका प्रसंगाचा १५ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. या अभिनेता महंमद झिशान आयुब हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा तरुण भगवान शिवाच्या भूमिकेत दिसत आहे. या वेळी त्याने शिवीगाळ केली आहे.
सामाजिक माध्यमांतून व्यक्त केलेली एक प्रतिक्रिया
या मालिकेचा दिग्दर्शक अली अब्बास आणि मुख्य भूमिकेत सैफ अली खान आहे. यामुळेच भगवान शंकराची भूमिका करून अशोभनीय शब्दांचा वापर करणे शक्य आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात