Menu Close

आंध्रप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करून ६९९ ‘ख्रिस्त गावे’ बनवणार्‍या पाद्रयाला अटक

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींना लाथ मारण्याचाही गुन्हा

  • हिंदूंना सर्वधर्मसभमावाचे डोस पाजून निद्रिस्त करणारे आता याविषयी का बोलत नाहीत कि अशी कृती करणे ही धर्मनिरपेक्षता आहे, असे त्यांना वाटते ?
  • ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ? उलट कुणी हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश केला, तर त्यालाही विरोध केला जातो !

गुंटूर (आंध्रप्रदेश) : हिंदु देवतांच्या मूर्तींना लाथ मारणार्‍या प्रवीण चक्रवर्ती या पाद्रयाला आंध्रप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या पाद्रयाने राज्यात ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ नावाची गावेही बनवली आहेत. त्याच्या ‘सायलम ब्लाइंड सेंटर’ या संघटनेच्या विरोधात ‘लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ या संस्थेने वर्ष २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रारही केली होते. (वर्ष २०१९ मध्ये तक्रार केल्यानंतरही त्यावर कारवाई का केली गेली नाही ?, याचे उत्तर गृहमंत्रालयाने दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाद्री चक्रवर्ती याच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे, धार्मिक स्थळी गुन्हे करणे आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. ‘लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ या संस्थेने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केलेल्या या पाद्रयाच्या एका व्हिडिओमध्ये ‘तो गावामध्ये रहणार्‍यांचे धर्मांतर कसे करतो’, हे सांगत आहे. त्यात तो म्हणत आहे की, प्रथम एका पाद्रयाला बोलावून बायबल शिकवले जाते. नंतर गावातीलच कुणीतरी एक येशूला पालनकर्ता मानतो आणि तो देवतांच्या मूर्ती, पूजनीय वृक्ष यांना लाथ मारतो. यानंतर हे गाव ‘ख्रिस्त व्हिलेज’ बनते. मी स्वःत देवाला लाथ मारली आहे आणि मला फार आनंद झाला आहे.

(सौजन्य : TV5 news)

२. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये एका अमेरिकी अर्पणदात्याशी बोलतांना तो सांगत आहे की, आमच्या संघामध्ये ३ सहस्र ६४२ पाद्री असून आम्ही आतापर्यंत ६९९ ‘ख्रिस्त व्हिलेज’ बनवली आहेत.

३. ‘लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ने या पाद्रयाच्या विरोधात ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’कडेही केली आहे. त्याची संघटना बालमजुरीपासून मुलांना मुक्त करण्याच्या नावाखाली विदेशातून देणग्या गोळा करते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *