-
तक्रारीनंतर गुन्हा नोंद
-
पक्षनेत्यांकडून तक्रारीकडे दुर्लक्ष
-
कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याची महिलेची चेतावणी
- प्रत्येक राजकीय पक्षांत अशा वासनांधांचा भरणा असल्याने असे राजकारणी लोकांना नैतिकता कधीतरी शिकवू शकतील का ? यासाठी धर्माचरण करणार्या धर्माधिष्ठित शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
- स्वतःच्या पक्षातील वासनांध पदाधिकार्यांवर कारवाई न करणारे राजकारणी गुन्हेगारांवर कारवाई करून महिलांना कधीतरी न्याय देऊ शकतील का ?
बुर्हाणपूर (मध्यप्रदेश) : येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक हुसेन यांच्यावर पक्षाच्या समितीच्या महिला पदाधिकार्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या महिला पदाधिकार्याने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, मुश्ताक गेली ४ वर्षे विवाह करण्याचे आश्वासन देऊन माझे लैंगिक शोषण करत आला आहे. त्याच्याशी प्रेम असल्यामुळे माझा तलाकही झाला आहे. जेव्हा मी मुश्ताककडे विवाहाचा विषय काढते, तेव्हा तो मला ठार मारण्याची धमकी देतो, तसेच आमच्यातील संबंधांची कुणाला माहिती दिली, तरी ठार करण्याची त्याने धमकी दिली आहे. याविषयी पक्षाच्या अनेक नेत्यांकडे तक्रार केली; मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच मला पोलिसांत तक्रार करावी लागली. जर मुश्ताकवर कारवाई झाली नाही, तर मी आत्महत्या करीन, अशी चेतावणही या महिलेने दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात