आक्षेपार्ह दृश्य काढेपर्यंत विरोध चालूच रहाणार ! – हिंदूंचा निर्धार
मुंबई : ‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी या प्रकरणी ट्वीट करून विनाअट जाहीर क्षमायाचना केली आहे. जफर यांनी लिहिले आहे, ‘आम्ही तांडवच्या प्रकरणी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून आहोत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमवेत १७ जानेवारीला झालेल्या बैठकीत याविषयी लोकांच्या आलेल्या तक्रारींची माहिती मिळाली. वेब सिरीज एक काल्पनिक आहे आणि जर यातील व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य असेल, तर तो योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, जात, समुदाय, वंश, धर्म, धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा किंवा संस्था, राजकीय पक्ष, जिवंत किंवा मृत व्यक्ती यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे लोकांच्या तक्रारींनी नोंद घेत आम्ही याविषयी विनाअट क्षमा मागत आहोत.’
‘जफर यांनी क्षमा मागितली असली, तरी जोपर्यंत या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत विरोध चालूच रहाणार’, असे हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात