Menu Close

समाजाला काय आवश्यक आहे, ते देणे हे धर्मकर्तव्य ! – आनंद मोंडकर, हिंदु जनजागृती समिती

देवगड : अलीकडे ‘डबलबारी’, ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ या भजनाच्या प्रकारांमध्ये देवतांचे विडंबन करण्यासह अश्‍लील बोलले जाते. ‘भजन’ म्हणजे सतत देवाला भजणे, त्याची भक्ती करणे होय. ही देवाकडे नेणारी कला आहे. भजनीबुवांनी समाजाला काय आवडते, त्यापेक्षा समाजाला काय आवश्यक आहे, ते दिले पाहिजे. हेच आपले धर्मकर्तव्य आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे प्रकार घडत आहेत. यांविषयीही भजनांतून प्रबोधन होणे आवश्यक आहे. धर्मावरील आघात परतवून लावण्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर यांनी केले.

सुप्रसिद्ध भजनीबुवा कोकण कलाभूषण कै. चंद्रकांत कदम यांच्या पुण्यस्मरणार्थ आरेफाटा येथील त्यांच्या स्मारकाजवळ ‘गुरुदास प्रासादिक मंडळा’च्या वतीने त्यांच्या शिष्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. मोंडकर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

या कार्यक्रमाला प्रभाकर कारेकर यांच्यासह भगवान लोकरेबुवा, प्रकाश पारकर, श्रीधर मुणगेकर, समीर कदम, प्रमोद धुरी, सुशील गोठणकर, श्रीकांत शिरसाट, जयवंत राऊळ आदी भजनीबुवा उपस्थित होते. कै. चंद्रकांत कदम यांच्या सर्व शिष्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री. आनंद मोंडकर यांच्यासह सर्व मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष भगवान लोकरेबुवा यांच्या हस्ते करण्यात आला. ७ भजनीबुवांना ‘सनातन पंचाग २०२१’ भेट देऊन धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

श्री. मोंडकर यांनी मांडलेल्या विषयानंतर महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान लोकरे यांनी ‘धर्मावर विविध माध्यमातून होणारे आघात आणि ‘डबलबारी’ यांविषयी अन्य भजनीबुवांचे प्रबोधन करू’, असे सांगितले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *