मुस्लिम राष्ट्रीय मंचाप्रमाणे अन्य मुसलमान संघटना बोलतील का ?
लक्ष्मणपुरी (लखनौ) / अयोध्या : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचने अयोध्येत राम मंदिरच उभे व्हावे, अशी मागणी केली आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच न्यायालयाच्या बाहेरच या समस्येवर चर्चेद्वारे उपाय काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मंचचे नेते महंमद अफझल यांनी म्हटले आहे की,
१. राममंदिर उभारणीचे मुसलमानांनी समर्थन केले पाहिजे.
२. आता राममंदिराच्या प्रश्नावर वाट पाहू शकत नाही. विचार करा की, ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्या देशात भगवान श्रीराम तंबूमध्ये आहेत.
३. आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर ते अधिकार सांगत आहेत. यासाठी आम्हाला सहमतीने राममंदिर बनवायला दिले पाहिजे.
४. इस्लाममध्ये मशीद बांधायची असेल, तर ती भूमी मुसलमानाची असावी लागते किंवा वक्फ बोर्डाची; मात्र अयोध्येत या दोन्ही गोष्टी नाहीत. मुसलमानांचा अधिकार त्या भूमीवर नाही जेथे गर्भगृह आहे.
५. आम्हा भारतीय मुसलमानांचे नाते रामाशी आहे, बाबरशी नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात