Menu Close

कुतुब मीनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधल्याचे पुस्तकातून शिकवणार्‍या NCERT कडे त्याविषयी पुरावे नाहीत !

वर्ष २०१२ मध्येच इतिहास संशोधक आणि लेखक नीरज अत्री यांच्या माहिती अधिकाराच्या अर्जातूनच समोर आले होते !

  • वर्ष २०१२ मध्येच हे स्पष्ट असतांनाही ते अजूनही विद्यार्थ्यांना का शिकवले जात आहे ? ‘केंद्रात गेल्या ६ वर्षांपासून भाजपचे सरकार असतांना हा खोटा इतिहास पालटून सत्य इतिहास का शिकवण्यात आला नाही, हे सरकारने सांगावे’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
  • कुतुब मीनार ही वास्तू हिंदूंची असून याचे नाव ‘विष्णुस्तंभ’ आहे, हे विविध इतिहासकारांनी पुराव्यानिशी समोर आणले आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आल्याने आता केंद्र सरकारने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे !

नवी देहली : एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मोगलांनी युद्धामध्ये तोडलेल्या हिंदूंच्या मंदिरांची नंतर बादशहा शहाजहान आणि औरंगजेब यांनी डागडुजी करण्यासाठी आर्थिक तरतूद केल्याचा कोणताही पुरावा नसलेला इतिहास शिकवण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. आता एन्.सी.ई.आर्.टी.’चा आणखी एक खोटारडेपणा माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे. एन्.सी.ई.आर्.टी.च्या ७ वीच्या ‘अवर पास्ट’ या पुस्तकात देहलतील कुतुब मीनार ही वास्तू कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश यांनी बांधल्याचे शिकवण्यात येत आहे; मात्र इतिहास संशोधक आणि लेखक नीरज अत्री यांनी २१ नोव्हेंबर २०१२ मध्येच माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरातून याविषयी एन्.सी.ई.आर्.टी.कडे कोणतेही पुरावे नसल्याचे उघड झाले आहे.

१. या पुस्तकात कुतुब मीनारचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, कुव्वतुल-इस्लाम मशीद आणि मीनार १२ व्या शतकाच्या शेवटी बांधण्यात आले. देहलीतील बादशहांनी नवीन नगर वसवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या इमारती बांधल्या. या नगराला इतिहासामध्ये ‘दिल्ली-ए-कुहना’ म्हटले जात होते ज्याला आता ‘जुनी देहली’ म्हटले जाते.

. कुतुबुद्दीन ऐबक याने येथील मशीद बनवण्यास प्रारंभ केला, तरी ती मामलुक साम्राज्याचा तिसरा सुलतान इल्तुतमिश याने पूर्ण केली. तो ऐबक याचा जावई होता.

३. या पुस्ताकामध्ये मशीद म्हणजे काय आणि त्याचा अरबी भाषेत अर्थ काय असतो, हेही सांगण्यात आले आहे. तसेच नमाजपठणाविषयीही माहिती देण्यात आली आहे.

इतिहास संशोधक आणि लेखक नीरज अत्री यांनी एन्.सी.ई.आर्.टी.ला विचारलेला ५ प्रश्‍ने आणि त्यांची उत्तरे

१. नीरज अत्री यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ५ प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यातून ही माहिती समोर आली आहे. अत्री यांनी विचारले होते, ‘ज्या आधारावर या दोघांनी कुतुब मीनार आणि तेथील मशीद बांधली ती कागदपत्रे आहेत का ? जर असतील, तर ती कोणती आहेत ?’ यावर एन्.सी.ई.आर्.टी.ने दिलेल्या उत्तरात म्हटलेे, ‘अशी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.’

२. या संदर्भात कोणत्याही शिलालेखाचा पुरावा आहे का ? त्याचे उत्तरही ‘नाही’ म्हणूनच मिळाले.

३. तिसरा प्रश्‍न होता की, ज्यांच्या शिफारसीमुळे हा भाग या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला आहे ?, त्यांची नावे सांगण्यात यावी. यावर उत्तर देतांना ‘पुस्तक मंडळाचे सदस्य, मुख्य सल्लागार, अध्यक्ष यांची नावे पुस्तकामध्ये देण्यात आली आहेत’, असे सांगण्यात आले.

४. या संदर्भातील पुराव्यांचे निरीक्षण कुणी केले आणि त्यांना कुणी मान्यता दिले ? यावर उत्तर देतांना ‘प्रा. मृणाल मिरी यांच्या अध्यक्षतेतील ‘नॅशनल मॉनिटरिंग कमिटी’ने याला अनुमती दिली आणि याचा उल्लेख पुस्तकात आहे’, असे सांगण्यात आले.

५. शेवटचा प्रश्‍न होता, ‘या पुराव्यांविषयी काही टीपण आहेत का ?’ या प्रश्‍नावर ‘असे टीपण नाहीत’, असे सांगण्यात आले.

(सौजन्य : OpIndia Hindi)

NCERT किताबों में तथ्य कम, झूठ ज्यादा: नीरज अत्री | Neeraj Atri on leftist propaganda in NCERT books

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *