कर्णावती (गुजरात) : गुजरातमधील भाजप सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचे ‘कमलम्’ (कमळ) असे नामांतर केले आहे. ‘या फळाला ड्रॅगन’ शब्द वापरणे योग्य नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखे दिसते. त्यामुळे या फळाला संस्कृत शब्दानुसार ‘कमलम्’ हे नाव देण्यात आले आहे’, असे राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी म्हटले आहे.
सध्या हे नाव गुजरातपुरतेच मर्यादित असणार आहे. गुजरातमधील कच्छ आणि नवसारी या भागांत शेतकरी कमलम्’ची शेती करतात. गुजरातच्या वन विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव पालटण्यासाठी याचिका केलेली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात