कोल्हापूर आणि कागल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर
कोल्हापूर : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार श्री. कणसे यांना आणि कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, गांधीनगरप्रमुख श्री. दिलीप सावंत, विभागप्रमुख श्री. दीपक पोपटानी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख श्री. सुनील पारपाणी, सर्वश्री योगेश लोहार, अजित चव्हाण, भूषण चौगुले, अजित पाटील, ओंकार जोशी उपस्थित होते. कागल येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नवनाथ पाटील आणि श्री. किरण चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि श्री. रोहित पाटील उपस्थित होते.
याच मागणीचे निवेदन सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि मिरज येथे प्रांत कार्यालयात देण्यात आले.