Menu Close

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ?

विदिशा (मध्यप्रदेश) : येथून ७० किमी अंतरावर असलेल्या उदयपूरनगरामध्ये १ सहस्र वर्षे प्राचीन असलेल्या परमार वंशाच्या राजमहालावर महंमद काझी सय्यद इरफान अली याने लावलेला खासगी संपत्तीचा फलक तहसीलदारांच्या आदेशानंतर प्रशासनाने हटवला आहे. तसेच ५ सहस्र रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. या ठिकाणी अली याच्याकडून मदरसा चालवण्यात येत होता. (पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्याने दावा केला होता की, हा राजमहल १ सहस्र नव्हे, तर ४०० वर्षे प्राचीन असून त्याचे बांधकाम त्याच्या पूर्वजांनी केल्याचे म्हटले होते.

बादशहा जहांगीर आणि शाहजहान यांनी त्याच्या कुटुंबियांच्या नावावर ही संपत्ती केली होती, असा दावाही अली याने केला होता. याविषयीची माहिती सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर प्रशासनाने याची नोंद घेत ही कारवाई केली. (सामाजिक माध्यमांतून माहिती मिळाल्यावर जागे होणारे प्रशासन इतकी वर्षे झोपले होते का ? जर अशी माहिती समोर आली नसती, तर प्रशासन अजून झोपलेलेच राहिले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *