इस्लाम म्हणजे शांती असे म्हटले जाते; मात्र इसिसला शांतीशी काहीही देणेघेणे नाही, हे जगाने लक्षात घेऊन त्यांच्यावर सैनिकी कारवाईच केली पाहिजे !
आगरतळा (त्रिपुरा) : आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा सिरिया आणि इराक या देशांमध्ये निर्घृण अत्याचार करत दहशत पसरवणार्या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेशी शांततेची चर्चा करण्याचा प्रस्ताव इसिसने धुडकावून लावला आहे. प्रस्ताव धुडकावतांना इसिसने श्री श्री रविशंकर यांना शिरच्छेद केलेल्या एका ओलिसाच्या मृतदेहाचे छायाचित्र पाठवले आहे.
श्री श्री रविशंकर म्हणाले,
१. काही दिवसांपूर्वीच मी इसिसशी शांततेची चर्चा करण्याचा प्रयत्न केला; पण एका व्यक्तीचे शिरच्छेद केल्यानंतरचे छायाचित्र त्यांनी मला पाठवले. त्यामुळे इसिसशी शांततेची चर्चा करण्याचे माझे प्रयत्न बारगळले.
२. माझ्या मते, इसिसला कोणत्याही प्रकारे शांततेची चर्चा नकोच आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर सैनिकी कारवाईच करावी लागेल. (श्री श्री रविशंकर यांनाही इसिसला सैन्य कारवाईने धडा शिकवावा, असेच वाटत आहे; मात्र भारतात इसिसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना समुपदेशन दिले जात आहे. याकडेही श्री श्री रविशंकर यांनी लक्ष द्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. सर्व धर्म, संस्कृती तसेच भिन्न मते आणि विचारधारा यांना एका धाग्यात गुंफण्याचा माझा उद्देश आहे. त्याच भावनेतून इसिसशी शांतता चर्चा करण्याचा प्रयत्न होता; मात्र या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. (जगभरातील धर्म, संस्कृती आणि भिन्न मते एकाच धाग्यात गुंफण्यासाठी हिंदूंप्रमाणे वसुधैव कुटुम्बकम् ही भावना सर्वांमध्ये असणे आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात