हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी लढा !
कोलंबो : श्रीलंकेत हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतराला आळा बसावा, यासाठी संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ या संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख श्री. मरावांपुलावू सच्चिदानंदन यांनी दिली.
उत्तर श्रीलंकेतील धर्मांतरविरोधी कार्य करणारे अरुमुगा नावलार यांच्या स्मरणार्थ ‘कार्थकाइ माथम’ हा दिवस ‘धर्मांतरविरोधी दिन’ म्हणून पाळला गेला. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सभा अथवा इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. त्याऐवजी देशातील २५ पैकी १७ जिल्ह्यांत धर्मांतरविरोधी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. हे विधेयक त्वरित संमत करावे, यासाठी शासनावर दबावही आणला जाणार आहे. याखेरीज स्वामी विवेकानंद यांच्या १५८व्या जयंतीनिमित्त ४ फेब्रुवारी या दिवशी धर्मांतरविरोधी भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात