-
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तच्या सरकारी कार्यक्रमात दिल्या गेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांची उपस्थिती
‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने ममता बॅनर्जी यांना त्रास होत असेल, तर त्यांनी शेजारील बांगलादेशमध्ये निघून जावे !
कोलकाता (बंगाल) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनखड, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते. या वेळी त्यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यात आल्यावर उपस्थित लोकांकडून ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी यावर संताप व्यक्त केला.
(म्हणे) ‘सरकारी कार्यक्रमाचा मान राखणे आवश्यक !’ – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी या घोषणाबाजीवर आक्षेप घेतांना, ‘सरकारच्या कार्यक्रमाचा मान ठेवणे आवश्यक आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. येथे कुणाला आमंत्रित करण्यात आल्यानंतर त्याला अपमानित करणे शोभा देत नाही. मी विरोधात काही बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला’ असे म्हणत त्यांनी त्यांचे भाषण संपवले.
(मोहरमच्या निमित्ताने मुसलमानांना मिरवणूक काढता यावी, यासाठी श्रीदुर्गादेवीची मिरवणूक रोखणे, राज्यात दंगली घडवणार्या धर्मांधांवर कारवाई न करणे या गोष्टी सरकारी नियमावलीत बसतात का ? स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही ‘जय श्रीराम’ घोषणांचा विरोध केला होता. राज्यात ममता बॅनर्जी एका ठिकाणी दौर्यावर असतांना काही लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने त्या संतप्त झाल्या होत्या. यानंतर घोषणाबाजी करणार्यांवर कारवाई करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात