Menu Close

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

गडहिंग्लज येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलीस यांना निवेदन सादर

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना, पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी (शिक्षण) विद्या भीमराव चौगुले-पोवार यांना, तसेच उपविभागीय पोलीस कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. वामन बिलावर आणि श्री. वासू बिलावर उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यावर विस्तार अधिकार्‍यांनी समितीचे कार्य चांगले असल्याचे मत व्यक्त केले.

जत (जिल्हा सांगली) येते तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे निवेदन सादर !

जत (जिल्हा सांगली) : येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार सचिन पाटील यांना आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. संगीता पट्टणशेट्टी, सौ. नीला हत्ती, सौ. अंबिका माळी उपस्थित होत्या.

नाशिकमध्ये जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक : प्रजासत्तकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, तसेच राज्यशासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. येथील जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नाशिकचे निवासी तहसीलदार पी.आर्. सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी धर्माभिमानी शिवभक्त श्री. रसिक शिंदे, श्री. कुणाल वडनेरे, श्री. अमित गंभीरे, श्री. शिवा शहाणे, सनातन संस्थेचे श्री. शिरीष ओझरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल पाटील उपस्थित होते.

ध्वजसंहिता डावलून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

पालघर

जिल्ह्यातील नालासोपारा पश्‍चिम आणि नालासोपारा पूर्व येथील तुळींज पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसैनिक श्री. जितेंद्र हजारे, राष्ट्रप्रेमी श्री. वशिष्ठ शुक्ला, श्री. प्रमोद वर्मा, श्री. आदर्श काळे, श्री. कमल पुरोहित, श्री. पिंटू गुप्ता, श्री. अमित निंबाळकर आणि समितीचे श्री. प्रसाद काळे उपस्थित होते.

पालघर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारतांना शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत
२२ जानेवारी या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी तहसीलदार चंद्रसेन पवार यांना, पालघर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत आणि बोईसर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक दादा शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ह.भ.प. श्री. प्रदीप महाराज पाटील, राष्ट्रप्रेमी श्री. सुभाष पाटील, श्री. राजेश कांबळे, कु. अंजली नाईक, कु. शर्मिला नाईक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश होनमोरे आणि अन्य उपस्थित होते.

मुंबई

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना राष्ट्रीय बजरंग दल, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय बजरंग दल वरळीचे अध्यक्ष श्री. संगठन शर्मा, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश कोळी, श्री. अनिल नाईक आणि श्री. अक्षय गाडे उपस्थित होते.

मुंबईतील माहीम पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाणे आणि शाहूनगर पोलीस ठाणे येथे २० जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. विनोद पागधरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल नाईक आणि श्री. विवेक भोईर हे उपस्थित होते.

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन राष्ट्रप्रेमी श्री. विनायक साळुंखे, श्री. सागर गवळी आणि श्री. अभय त्रिवेदी यांनी दिले.

नवी मुंबई

प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि ए.पी.एम्.सी. पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले.

पुणे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मोहीम

पुणे : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा मान न राखणार्‍यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी शालेय शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या प्रबोधनासाठी समितीच्या सहभागातून जिल्हास्तरीय कृती समिती गठीत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची विनंती केली.

भोर येथेही निवासी नायब तहसीलदार आर्.टी. झाजरी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. मनोहरलाल उणेचा, अखिल श्रीगौड ब्राह्मण समाज संघटनेचे कार्यकर्ते, समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. हे निवेदन पोलीस उपआयुक्त विशेष शाखा पुणे शहर यांच्या कार्यालयातही देण्यात आले. याचसमवेत हडपसर येथील साने गुरुजी शाळा, कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालय तसेच साधना विद्यालय येथेही देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री प्रशांत लोखंडे, सचिन घुले, साधना शाळेतील पर्यवेक्षक श्री. मोहिते, श्री. पवार, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे श्री. मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे श्री. आनंद भोईटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील शिक्षण मंडळाचे साहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. पराग मुंढे यांना निवेदन देण्यात आले. शिक्षण मंडळ वर्ग १ चे प्रशासकीय अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्यांच्या कार्यालयात निवेदन दिले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री गोरख फलके, काळूराम फलके, कैलास कुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *