मुंबई : राष्ट्रीय अस्मिता असलेल्या राष्ट्रीय ध्वजाचा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच होणारा अवमान दुर्दैवी आहे. ध्वजसंहितेचे पालन न केल्यामुळे कागदाचे आणि प्लास्टिकचे ध्वज, तसेच ध्वजाच्या रंगातील मास्क, कपडे, केक सिद्ध केले जातात. त्यामुळे ध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. सकाळी अभिमानाने छातीवर, हातात आणि वाहनांवर मिरवलेले कागदी आणि प्लास्टिकचे ध्वज त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत रस्त्यावर, गटारात आढळून येतात. रस्त्यावर पडलेले ध्वज पायदळी तुडवले जातात. राष्ट्रध्वजाचा आणि या ध्वजासाठी प्राणांची आहुती देणार्या राष्ट्रवीरांचाही हा घोर अवमान आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यासाठी समितीच्या वतीने प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
पालघर
जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिम आणि नालासोपारा पूर्व येथील तुळींज पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसैनिक श्री. जितेंद्र हजारे, राष्ट्रप्रेमी श्री. वशिष्ठ शुक्ला, श्री. प्रमोद वर्मा, श्री. आदर्श काळे, श्री. कमल पुरोहित, श्री. पिंटू गुप्ता, श्री. अमित निंबाळकर आणि समितीचे श्री. प्रसाद काळे उपस्थित होते.
२२ जानेवारी या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी तहसीलदार चंद्रसेन पवार यांना, पालघर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत आणि बोईसर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक दादा शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ह.भ.प. श्री. प्रदीप महाराज पाटील, राष्ट्रप्रेमी श्री. सुभाष पाटील, श्री. राजेश कांबळे, कु. अंजली नाईक, कु. शर्मिला नाईक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश होनमोरे आणि अन्य उपस्थित होते.
मुंबई
मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना राष्ट्रीय बजरंग दल, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय बजरंग दल वरळीचे अध्यक्ष श्री. संगठन शर्मा, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश कोळी, श्री. अनिल नाईक आणि श्री. अक्षय गाडे उपस्थित होते.
मुंबईतील माहीम पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाणे आणि शाहूनगर पोलीस ठाणे येथे २० जानेवारी या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. विनोद पागधरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल नाईक आणि श्री. विवेक भोईर हे उपस्थित होते.
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन राष्ट्रप्रेमी श्री. विनायक साळुंखे, श्री. सागर गवळी आणि श्री. अभय त्रिवेदी यांनी
नवी मुंबई
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि ए.पी.एम्.सी. पोलीस ठाणे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.