Menu Close

‘तांडव’ मालिकेवर बंदी घालणे आणि राष्ट्रध्वजाचा मान राखणे या दोन विषयांसाठी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

जळगाव : प्रजासत्ताकदिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालण्याविषयी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

सध्या विविध दुकानांतून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत आहे. राष्ट्रध्वजाची ही एक प्रकारे विटंबनाच आहे. तिरंग्याचा ‘मास्क’ वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. ‘अ  प्राईम’ व्हिडिओवर प्रसारीत झालेल्या ‘तांडव’ वेब मालिकेत देवतांचा अपमान करण्यात आल्याने धर्मप्रेमींनी या दोन विषयांवर पोलीस आणि प्रशासनाने तत्परतेने कृती करावी म्हणून निवेदने दिली.

भुसावळ येथील प्रांत अधिकारी श्री. रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले. या वेळी गोसेवक प्रणव डोलारे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख चेतन भोई, धर्मप्रेमी प्रवीण भोई, संजय भोई, रीशभ जैन, उमेश जोशी उपस्थित होते. यावल येथील पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि नायब तसीलदार आर्.के. पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना धर्मप्रेमी हेमंत बडगुजर, धनराज कोळी, मयूर महाजन, हिंदु जनजागृती समितीचे धीरज भोळे, लखन नाथ, चेतन भोईटे उपस्थित होते.

चोपडा येथील तहसीलदार छगन वाघ यांना तसेच पोलीस निरीक्षक अवतार सिंग चौहान यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री प्रदीप बारी, युवा सेनेचे शहर प्रमुख अशोक वनारसे, अमोल महाजन, अनिल पाटील, भगत पाटील, किशोर दुसाने, यशवंत चौधरी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

एरंडोल येथील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांना, तर धरणगाव येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विनोद शिंदे, विक्की ठाकूर, योगेश वाघ, रमेश महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *