हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ
उत्तरप्रदेशमध्ये विविध ठिकाणी प्रशासनाला निवेदन
वाराणसी : तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे. त्यामुळे तिरंगा मास्क आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज यांची विक्री आणि वापर करणारे यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी येथे आयुक्त, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर आणि पिंडरा येथील तहसीलदार अन् अयोध्या येथील प्रशासन यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अश्वासन वाराणसीच्या अप्पर जिल्हाधिकार्यांनी दिले.
या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषदचे अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, गंगा महासभा वाराणसीचे अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता विजय पाठक, अधिवक्ता दीप संध्या, हिंदु जनजागृती समितीचे राजन केशरी, श्रीकांत जायसवाल, प्रखर सिंह, शुभेंदु पांडेय, सुनील पटेल, सत्यप्रकाश शर्मा, अक्षय पटेल, गौतम पटेल, सरोज पांडेय, श्रीमती विनोदी पांडेय आदी उपस्थित होते.