हिंदूंनो, आमिषाला बळी पडून किंवा धर्मात सन्मान मिळत नाही, असा आरोप करून नाही, तर शस्त्र अनुज्ञप्ती मिळण्यासाठी मुसलमान धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या !
घरवापसीवर आकांडतांडव करणारे ढोंगी निधर्मीवादी यावर काही बोलणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बागपत (उत्तरप्रदेश) : शस्त्र बाळगण्याची अनुज्ञप्ती (परवाना) सहज मिळावी म्हणून एका मुसलमान तरुणाने हिंदु धर्म स्वीकारला आहे. फुरकान अहमद या मुसलमान तरुणाने हिंदु धर्मांत प्रवेश करून स्वतःचे नाव फूल सिंह ठेवले आहे. त्याने आता कपाळावर टिळा लावायला आणि टक्कल करून केवळ शेंडी ठेवायला देखील प्रारंभ केला आहे.
फुरकान अहमद हा ६ मुलांचा पिता असून तो उदरनिर्वाहासाठी इ-रिक्शा चालवतो. सुरक्षा पुरवणार्या आस्थापनांत मोठ्या पदावर काम मिळावे म्हणून त्याला शस्त्र अनुज्ञप्ती हवी होती; मात्र गेल्या ६ वर्षांपासून त्याला ही अनुज्ञप्ती मिळालेली नाही. आता धर्मांतर आणि नामांतर केल्यामुळे शस्त्र अनुज्ञप्ती मिळणे सोपे होईल, असे फुरकानला वाटते. तो म्हणाला की, गेल्या ६ वर्षांत १० जिल्हाधिकारी पालटले; पण एकाने ही मला अनुज्ञप्ती दिली नाही; मात्र याच कालावधीत इतर ३७८ जणांना शस्त्र अनुज्ञप्ती मिळाली.
बागपत जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की, आलेल्या प्रत्येक अर्जदाराला अनुज्ञप्ती देण्याचे आमच्यावर बंधन नाही. अर्जदाराला शस्त्र अनुज्ञप्तीची खरीच आवश्यकता आहे का ? अनुज्ञप्तीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे का ? हे आधी पडताळले जाते आणि मग अनुज्ञप्ती द्यायचा निर्णय घेतला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात