Menu Close

इंदूर : प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

  • जगातील एकातरी ख्रिस्ती राष्ट्रात हिंदूंच्या धार्मिक संघटना तेथील ख्रिस्त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, असे ऐकले आहे का ? उलट अनेक ख्रिस्ती स्वतःहून हिंदु धर्माचा स्वीकार करत आहेत !
  • हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या अशा मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

इंदूर (मध्यप्रदेश) : येथील भंवरकुआं भागात गरीब हिंदूंचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतर होणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाली. या माहितीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर प्रार्थनासभेच्या आयोजकासमवेत ११ जणांवर गुन्हा नोंदवून ९ जणांना अटक करण्यात आली.

 ‘सत्यप्रकाश संस्थे’कडून ही प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मोठ्या संख्येने गावातील महिला आणि मुले उपस्थित होते. ‘या प्रार्थनासभेसाठी अनुमती घेण्यात आली नव्हती’, असे पोलिसांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *