पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण
- केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
- राजदीप सरदेसाई आदींसारख्या पत्रकारांची पत्रकारिता किती उथळ आहे, हे लक्षात येते. असे पत्रकार हे समाजासाठी घातक होय !
नोएडा (उत्तरप्रदेश) : प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांच्यागोळीबारत १ शेतकरी ठार झाला, अशी अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, ‘इंडिया टुडे’चे पत्रकार राजदीप सरदेसाई, ‘नॅशनल हेरॉल्ड ग्रुप’च्या संपादकीय सल्लागार मृणाल पांडे, पत्रकार जफर आगा, परेशनाथ, अनंतनाथ, विनोद के. जोस आदींच्या विरोधात देशद्रोह, अशांती पसरवणे, हिंसा भडकावणे आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात