नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसरे कारण आहे. वर्ष २०१८ मध्ये ९६ लाख लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. कर्करोग होण्यामागे दैनंदिनी जीवनशैली आणि भोजन यांच्या सवयींचा प्रभाव असतो, असे या संघटनेने म्हटले आहे. मैदा, पॉपकॉर्न, बटाटा चिप्स, प्रक्रिया केलेले मांस आदींमुळे कर्करोग होत असल्याची माहिती समोर आली आहे. पॅकबंद अन्नपदार्थांपासून ते भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे आरोग्याच्या तक्रारी चालू होतात. जर कर्करोगापासून कायमचे दूर रहायचे असेल, तर काही गोष्टींपासून दूर रहायला हवे.
१. सोडा हा प्रकृतीसाठी घातक आहे. याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्यास मृत्यूही होऊ शकतो. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे कर्करोगाच्या कोशिका वाढतात. यात कोणतेही पोषक तत्त्व नसतात. कृत्रिम रंग आणि रसायन यांमुळे हा घातक बनलेला असतो.
२. मायक्रोवेव्ह बॅगमध्ये पॉपकॉर्न बनवले जाते. यामुळे ‘पीएफ्ओए’ या नावाचा घटक मिसळतो. यामुळे यकृत, मूत्राशय आदींचा कर्करोग होऊ शकतो. जेव्हा पॉपकॉर्न मायक्रोवेव्ह बॅगमध्ये भाजले जातात, तेव्हा पीएफ्ओए हा घटक पॉपकार्नवर एक थर बनवतो. पॉपकॉर्न केवळ गॅस किंवा स्टोव्हवर बनवला, तर तो नैसर्गिक असतो आणि हानीकारक नसतो; मात्र मायक्रोवेव्ह बॅगमध्ये बनवला, तर घातक ठरतो.
३. प्रक्रियायुक्त मांसामध्ये कॅर्करोग निर्माण करणारे घटक असतात. त्यामुळे याचा वापर करणे टाळावे.
४. मद्याचे नियमित सेवन केले जात असेल, तर त्याचा परिणाम यकृत आणि मूत्रपिंड यांवर होतो. यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
५. मैद्यामुळेही कर्करोग होतो, हे सत्य आहे. मैदा बनवतांना त्याला येणारा पांढरा रंग क्लोरीन गॅसमुळे येतो. तसेच त्याचा ‘ग्लाइसेमिक इंडेक्स’ अधिक असतो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणार्या इंसुलिनचा स्तर वाढवतो.
६. बटाटा चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि संतृप्त वसा असतो. याचा शरिरावर वाईट परिणाम हातो. तसेच यात ‘एक्रिलामायड’ असते जे एक कार्सिनोजेनिक रसायन आहे. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हे रसायन सिगरेटमध्येही सापडते जे सिगरेटला अधिक धोकादायक बनवते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात