Menu Close

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) :  उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी शिक्षकांच्या भर्तीमध्ये घोटाळा झाला आहे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड आहे.

माहिती अधिकाराच्या अर्जामुळे ही घटना समोर आली आहे. आता राज्य सरकारने विशेष अन्वेषण पथकाद्वारे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील मिर्झापूर आणि आझमगड जिल्ह्यांतील ४०० मदरशांवर या घोटाळ्याचा संशय आहे.

या मदरशांत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कागदावरची परिस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांमधील भेद लक्षात येणार आहे. यामध्ये शिकवणारे शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी यांचे ‘पोलीस रेकॉर्ड’ तपासले जाणार आहे, तसेच शिक्षकांच्या कागदपत्रांचीही चौकशी होणार आहे. (नियमानुसार असे करणे बंधनकारक असतांना प्रशासनाने असे न करताच या मदरशांना सरकारी पैसे कसे संमत केले ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो. याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !  – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *