Menu Close

ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या ‘टूलकिट’मध्ये शेतकरी आंदोलनामागे खलिस्तान्यांचा हात असल्याची माहिती

आंदोलन कसे करायचे, याचीही विस्तृत माहिती ; खलिस्तानवादी संघटनांचा सहभाग

  • भारतामधील आंदोलनामागे परदेशातून हस्तक्षेप केला जातो, आंदोलन कसे करावे, याचे नियोजन केले जाते आणि त्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत नाही आणि नियोजनानुसार हिंसाचार होतो, हे भारताला लज्जास्पद !
  • आंदोलन रोखू न शकणारे पोलीस आणि प्रशासन जिहादी आतंकवादी आक्रमणे कशी रोखणार ?

नवी देहली – स्विडनची कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने दोन दिवसांपूर्वी भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करत एक लिखाण (टुलकिट) पोस्ट केले होते. या लिखाणावरून देहली पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा गुन्हा नोंदवल्यानंतरही ग्रेटा हिने ‘मी भारतातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. कुठल्याही धमकीला घाबरून हा निर्णय पालटणार नाही’, असे स्पष्ट करत अद्ययावत ‘टूलकिट’ शेअर केली आहे.

टूलकिट म्हणजे काय ?
१. ही टूलकिट शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल, याची ही मार्गदर्शक तत्त्वाची सूची आहे. सामाजिक माध्यमांवर आवाहन करतांना कोणत्या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा ? आंदोलन करत असतांना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा ? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये ? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत.

२. अमेरिकेत गतवर्षी पोलिसांनी एका कृष्णवर्णीय नागरिकाची भररस्त्यातच हत्या केली होती. त्याविरोधात जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर ‘ब्लॅक लिव्हज् मॅटर्स’ अशा नावाची मोहीम चालू झाली. भारतासह जगभरातील लोकांनी त्यामध्ये सहभागी होऊन कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला होता. आंदोलकांनी त्या वेळी ‘टूलकिट’ बनवले होते.

३. या टूलकिटमध्ये आंदोलनाशी संबंधित काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्यासाठी कसे जावे लागेल ?, कुठे जायचे आणि कुठे जाऊ नये ? पोलिसांनी कारवाई केल्यास काय करावे ? आंदोलनात सहभागी होतांना कपड्यांमुळे अडचण येणार नाही यासाठी कशा प्रकारचे कपडे घालावेत ?, पोलिसांनी पकडल्यास तुमचे काय अधिकार आहेत ? आदी माहिती देण्यात आली होती. हाँगकाँग आणि चीनमध्येसुद्धा आंदोलन चालू असतांना अशा टूलकिट बनवण्यात आल्या होत्या.

 ग्रेटा थनबर्ग हिच्या टूलकिटमध्ये काय आहे ?

ग्रेटा थनबर्ग हिच्या नव्या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाविषयी नियोजन देण्यात आले आहे. ४-५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २ या काळात ट्वीट करणे. एक इमेल पत्ता देऊन त्यावर व्हिडिओ, छायाचित्र शेअर करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी प्रतिनिधींना संपर्क करणे, ऑनलाईन पिटशनवर स्वाक्षरी करणे, अंबानी आणि अडाणी या उद्योपतींपासून दूर रहाणे, १३ आणि १४ फेब्रुवारीला भारतीय दूतावास, वृत्तवाहिन्यांची कार्यालये, सरकारी कार्यालये यांना घेराव घालणे आदी देण्यात आले आहे.

ग्रेटाच्या जुन्या टूलकिटमध्ये २६ जानेवारीला कशा प्रकारे आंदोलन करायचे याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. यामागे कॅनडातील ‘पोयटिक जस्टिस फाऊंडेशन’ आणि ‘ग्रीन्स विथ फार्मर्स यूथ कोअलिशन’ या संघटनांच्या संकेतस्थळांच्या लिंक्स देण्यात आल्या होत्या.

‘पोयटिक जस्टिस फाऊंडेशन’ काय आहे ?

‘पोयटिक जस्टिस फाऊंडेशन’ (पी.जे.एफ्.) ही कॅनडामधील संस्था आहे. तिच्या संकेतस्थळावर लिहिले आहे, ‘भारत एक फॅसिस्ट, हिंसक आणि हुकूमशाही सरकारच्या दिशेने वाटचाल करत आहे.’

या संकेतस्थळावर खलिस्तानवादी आणि पाकिस्तान समर्थक कॅनडातील खासदार जगमीत सिंह यांची अनेक विधाने आहेत. या संस्थेने ‘खलिस्तान-द सिख फ्रीडम स्ट्रगल’ नावाने एक वेबिनारही आयोजित केला होता. याच्या संचालकांमध्ये ‘मो. धालीवाल’ हेही नाव आहे. तो स्वतःला खलिस्तानवादी म्हणवून घेत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *