अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !
चेन्नई : एका याचिकेवर सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने ख्रिस्ती मिशनर्यांना इतरांपेक्षा स्वतःचा धर्म श्रेष्ठ असल्याचे दाखवण्यावरून खडसावले. या वेळी न्यायालयाने हिंदूंच्या मंदिरांविरुद्ध केलेल्या विखारी वक्तव्यांविषयी ख्रिस्ती मिशनरी मोहन लाजारस यांनी मागितलेली विनाअट क्षमायाचना स्वीकार करून त्यांच्या विरुद्धचे खटले मागे घेण्याचा आदेश दिला.
१. न्यायालयाने आदेश देतांना म्हटले की, धर्माच्या प्रसारात सहभागी असलेल्या व्यक्तींचे उत्तरदायित्व अधिक असते. दुसर्यांच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात गरळ ओकणे आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या अनुयायांमध्ये दुसर्याविरुद्ध द्वेष वाढवणे हे एखाद्या धर्माचे उद्दिष्ट असूच शकत नाही. मनुष्याला सत्याकडे जाण्यास साहाय्य करणे, हेच कोणत्याही धर्माचे उद्दिष्ट असते.
२. न्यायालयाने म्हटले की, भारताला समृद्ध संस्कृती आणि मूल्यव्यवस्था लाभली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना त्यांच्या भावना आणि हक्क यांची पायमल्ली होतांना वेदना होतात. त्याचे पालन न केल्यास या देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल. तसेच राज्यघटनेतील मूलभूत रचनेलाही धोका होऊ शकते.
३. न्यायालयाने येशू ख्रिस्ताचे म्हणणेही उधृत केले की, कोणत्याही परिस्थितीत धर्म किंवा त्याचा आदर्श त्याच्या अनुयायांना स्वतःच्या धर्माची वाढ आणि प्रसार करतांना दुसर्या धर्माचा उपहास करण्यासाठी किंवा त्याविरोधी विखारी प्रसार करण्यास प्रवृत्त करत नाहीत.
४. या प्रकरणातील तक्रारदारांनाही ‘भविष्यात असे वक्तव्य करणार नाही’, असे आश्वासन देऊन या प्रकरणाचा शेवट करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात