Menu Close

केरळ : मदरसा शिक्षकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलाची केली हत्या !

स्वतःच्या मुलाचा निर्दयपणे खुन करू शकणार्‍या महिलेने मदरशांतील किती मुलांना हिंसा शिकवली असू शकते, याची कल्पना करता येत नाही !

पलक्कड (केरळ) : येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्‍या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती आहे.

आरोपी महिलेने हत्या करून स्वत: पोलीस आणि तिच्या नातेवाइकांना दूरभाष करून घटनेची माहिती दिली. या आरोपी शिक्षिकेने सांगितले, ‘मी माझ्या मुलाची अल्लासाठी कुर्बानी दिली आहे.’ यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे.

या महिलेने ७ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता हा मुलगा झोपलेला असतांना त्याला उठवून स्नानगृहात नेले. तेथे त्याचे हातपाय बांधले, त्यानंतर तिने मुलाचा गळा चिरला. या वेळी मुलगा तडफडत होता. घटनेच्यावेळी आरोपी महिलेची दोन्ही मुले वडिलांसमवेत  दुसर्‍या खोलीमध्ये झोपली होती. आरोपी महिलेचा पती काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *