Menu Close

केरळ : हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे हिंदू नेता आर्.व्ही. बाबू यांना अटक

केंद्र सरकारनेच हलाल उत्पादन विकणे बंधनकारक नसल्याचा पालट केला असतांना, जर कुणी अशा प्रकारचेच आवाहन करत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ? केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !

कोची (केरळ) : हिंदु ऐक्य वेदी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना हिंदूंना हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावरून केरळमधील माकपच्या आघाडी सरकारच्या पोलिसांनी अटक केली. यापूर्वी श्री. बाबू यांनी ‘हलाल इकॉनॉमिक्स’चा धोका स्पष्ट करत ‘हिंदूंनी याला बळी पडू नये’, असे आवाहन केले होते. तसेच याविषयीचे व्हिडिओ यू ट्यूबवर ठेवल्याने हिंदु आणि मुसलमान यांच्यात वाद होऊ शकतो, असे सांगत पोलिसांनी बाबू यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंद केला होता.

१. आर्.व्ही. बाबू यांच्या अटकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राज्यव्यापी निषेधाचे आवाहन केले. यापूर्वी एका बेकरीमध्ये हलाल चिन्ह प्रदर्शित केल्याचा निषेध केल्याच्या प्रकरणी हिंदू ऐक्य वेदीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

२. यापूर्वी आर्.व्ही. बाबू म्हणाले होते, ‘‘भारतात हलाल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमीयत-उलेमा-हिंद ट्रस्ट हे आस्थापन अर्जदाराकडून शुल्क म्हणून काही रक्कम आकारते. ते या रकमेचा एक भाग जकात म्हणून देतात. यामागील एक तथ्य असे आहे की, ही जकात संशयास्पद उद्देशाने वापरली जाते. याचा उपयोग सध्या जे आतंकवादी कारागृहात आहेत त्यांना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी केला जात आहे . ही गोष्ट ट्रस्टच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.’’

३. भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् आणि प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी या अटकेचा निषेध केला आहे आणि राज्य सरकारवर आरोप केला आहे की, या अटकेच्या माध्यमातून कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *