जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार, असा प्रश्न जनतेला पडला आहे !
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस आणि एन्.सी.बी. अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात सहभागी व्यक्तींंच्या अटकेचे धाडसत्र राबवत आहेत. महिला पोलीस उपलब्ध नसल्याने पोलिसांना संबंधितांचा शोध घेण्यास अडचण येते, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातून अमली पदार्थ व्यावसायिकांची नावे उघड होत आहेत. अमली पदार्थांचा व्यवहार रोखीने चालत असल्याने त्या पैशांची हे धंदेवाले दुसर्यांच्या नावाने संपत्ती खरेदी करतात, असे लक्षात आले आहे.
ए.एन्.सी. (अँटी नार्कोटिक्स सेल) ने कुर्ला येथून अटक केलेली शबीना खान आणि तिच्या पतीचा अमली पदार्थांचा धंदा सांभाळत होती. दुसर्याच्या नावावर घेतलेले चारचाकी वाहन तिच्याजवळ होते. वांद्रे झोपडपट्टीतून २० वर्षांपासून हा धंदा करणार्या निलोफर शेखला पकडण्यात आले. तिच्याजवळ एम्.डी. आणि हिरॉइन हे अमली पदार्थ सापडले. चेंबूरमधून पकडलेल्या फातिमा शेख हिच्याजवळ हेम्प नावाचा अमली पदार्थ सापडला. कोरोनाच्या कारणामुळे तिला जामीन मिळाला. भिवंडीतील झोपड्यांत तिने अड्डे बनवले आहेत. महमुदा शेख हिला पी डिमेले रोडवरून २० लाख रोख रकमेसह पकडण्यात आले. तिचा पती कारागृहात आहे. नजमा आणि फातिमा या महिलांनाही पकडण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात