- गुलाम नबी आझाद हे राजकारणात २८ वर्षे कार्यरत असतांना त्यांना हे सत्य सांगायला इतकी वर्षे का लागली ? असे किती मुसलमान नेते आहेत ज्यांना ही वस्तूस्थिती ठाऊक आहे; मात्र ते सत्य कधीही बोलत नाहीत ? ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता यावर बोलतील का ?
- भारतात हिंदू धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णु असल्याने भारत जगातील एक शांततवादी देश आहे; मात्र त्याचे मूल्य हिंदूंनी प्राण देऊन किंवा अत्याचार सहन करून मोठ्या प्रमाणावर चुकवले आहे आणि चुकवत आहेत. हिंदूंना शांतता हवी असल्याने आता त्यांनी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध व्हावे !
- गुलाम नबी आझाद काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना किंवा केंद्रात मंत्री असतांना त्यांनी काश्मीरमधील हिंदूंंना पुन्हा खोर्यात वसवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, हेही त्यांनी सांगायला हवे !
नवी देहली : मागील ३० ते ३५ वर्षांत अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण, मुसलमान कसे एकमेकांसमवेत लढून संपत चालले आहेत, हे बघत आहोत. तिथे तर हिंदू नाहीत. तिथे ख्रिस्तीही नाहीत. तिथे दुसरे कुणी लढत नाहीत. ते आपसांतच लढत आहेत.
जेव्हा मी वाचतो की, पाकिस्तानात कशी परिस्थिती आहे, तेव्हा मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे. इतकेच नाही, तर मी असे म्हणेन की, जगात जर कोणत्या मुसलमानांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुसलमानांना वाटायला हवा, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत त्यांचा कार्यकाळ संपत आल्याच्या दिवशी आभार प्रदर्शनाच्या वेळी भाषण करतांना केले.
आझाद पुढे असेही म्हणाले की, माझी नेहमीच अशी भूमिका राहली आहे की, आम्ही नशीबवान आहोत. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला. मी त्या नशीबवान लोकांपैकी आहे जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. मला भारतीय मुसलमान असल्याचा अभिमान आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात